१)इतिहासाच्या साधनांमधील दृक -श्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत .
२)पुण्यातील आगाखान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते .
३)विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय .
४)लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली .
प्रश्न २ .पुढील विधाने सकारण स्पष्ट करा .
१)ब्रिटिश राजवटीत वृत्तपत्रे ही सामाजाचे प्रबोधन करण्याची साधने म्हणून काम करत होती .
उत्तर -ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोक शिक्षणाचीही काम केले .भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दुष्ट चाली-रिती रुढी-परंपरा यांच्यावरील टीका केली .स्त्रियांवरील अत्याचार स्त्री-भ्रूणहत्या बालविवाह विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रथांवर लिखाण करून लोकमत जागृत केले .इंग्रजांच्या जुलमाविरुध्द लेखन करताना पाश्चात्त्य विद्या वैज्ञानिक दृष्टिकोन स्वातंत्र्य समानता आदि मुल्ये यांचे महत्त्व पटवून दिले .
२)चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधन मानले जातात .
उत्तर - समाज जीवनातील एखादी चांगली घटना आदर्श मूल्ये आदर्श विचार यांवर चित्रपट निघतात . चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्वपूर्ण अविष्कार असून भारताच्या इतिहासावर त्या प्रकाश टाकतात .अगं भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रूपा चित्रफिती मुळे आज आपल्याला पाहायला मिळतात .तत्कालीन सामाजिक ,धार्मिक ,राजकीय ,सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्याने चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधन मानले जातात .
प्रश्न ३ .टिपा लिहा .
१)छायाचित्रे -
छायाचित्रावरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या त्यांचे पेहराव कसे होते यांची माहिती मिळते .छायाचित्रांमुळे व्यक्ती वस्तू प्रसंग घटना आहे त्या स्वरूपात दिसतात .छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते .परंतु त्या काल्पनिकता व व्यक्तीसापेक्षताही असे .घडत असलेल्या प्रसंगाचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते .त्यामुळे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वासनीय दृक साधने मानली जातात .
२)वस्तुसंग्रहालय आणि इतिहास -
ज्या ठिकाणी प्राचीन वस्तू , भांडी , शस्त्रे ,नाणी , कागदपत्रे , वस्त्रे इ.कलात्मक पद्धतीने मांडणी करुन लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात अशा संग्रहाला वस्तुसंग्रहालय असे म्हणतात . या वस्तूंवरून तत्कालीन सामाजिक राजकीय धार्मिक इतिहासाची माहिती मिळते .नाण्यांवरून त्याकाळात वापरात असले ले धातू लोकांची आर्थिक स्थिती यांची कल्पना येते .शिल्पकला चित्रकला धातू कला शास्त्र कला इत्यादी कलातील प्रगती समजते .
३)श्राव्य साधने -
ध्वनीमुद्रीतांचा समावेश श्राव्य साधनांत होतो . ध्वनीमुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर ही साधन इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्त्वाची ठरली .रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेले 'जन -गण-मन ' हे आपले आजचे राष्ट्रगीत सुभाष चंद्र बोस महात्मा गांधी यांची भाषणे यांच्या ध्वनीफिती इतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त असतात . या श्राव्य साधनांमधून इतिहासाच्या अभ्यासकांना तत्कालीन सामाजिक , सांस्कृतिक ,वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाची माहिती मिळू शकते .
प्रश्न ४ .पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा
स्वाध्याय सोडवा - CLICK HERE
Post a Comment