प्रश्न १ .दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा .

१) इ .स .1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी     
कॉन्स्टॅन्टिनोपल      हे शहर जिंकून घेतले .

२) औद्योगिक क्रांतीला प्रारंभ       इंग्लंडमध्ये     झाला .

३)इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न     मीर कासीम          त्याने केला .

प्रश्न २ . पुढील संकल्पना स्पष्ट करा .
१)वसाहतवाद -
        आर्थिक दृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापक व त्या ठिकाणी आपला व्यवहार वसाहत स्थापन करून आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय .युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतूनच पुढे साम्राज्यवादाचा उदय झाला .युरोपीय देशांनी आशिया आफ्रिका खंडातील देशांची आर्थिक शोषण करता यावी म्हणून तेथील सतत स्वतः बळकावून तेथे आपली वसाहत निर्माण केली .

२)साम्राज्यवाद -   
                 विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे म्हणजे ' साम्राज्यवाद ' होय .आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमेपलीकडील इतर भागांवर सत्ता गाजवणे म्हणजेच साम्राज्यवाद होय .लष्करीदृष्ट्या बलवान असलेल्या युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्यवादी धोरण पुढे आशिया व आफ्रिकेतील राष्ट्रे टिकू न शकल्यामुळे ती राष्ट्रे गुलाम बनली .

३)प्रबोधन युग -
                 मध्ययुगाच्या उत्तरार्धात युरोप खंडात धर्मसुधारणा चळवळीने जोर धरला भौगोलिक शोधामुळे नवनवे प्रदेश झाले . या बदलांमुळे कला ,स्थापत्य , तत्त्वज्ञान , प्राचीन परंपरा यांचे पुनरुज्जीवन घडून आले मानवता
वादाला चालना मिळाली नव्या कल्पनांना आणि सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली घटना इसवी सनाच्या तेराव्या ते सोळाव्या शतकांत भरून आल्या म्हणून या काळाला '  प्रबोधन युग 'असे म्हणतात .

४)भांडवलशाही -
            ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेस ' भांडवलशाही अर्थव्यवस्था 'असे म्हणतात .ओपन या अर्थव्यवस्थेत भांडवल कमी आणि उद्योजक यांच्या परस्पर सहकार्याने वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते . अधिकाधिक नफा मिळवणे हे उत्पादन निर्मितीचे उद्दिष्ट असते .

प्रश्न ३ .पुढील विधाने सकारण स्पष्ट करा .
१ )प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला .
उत्तर -  सिराज उद्दौला याने इंग्रजांची कोलकत्याची वखार काबीज केल्यामुळे इंग्रजां मध्ये असंतोष निर्माण झाला .नवाबाचा सेनापती मीर जाफर याला नवापदा चे आमिष दाखवून रॉबर्ट क्लाइव्ह नेत्याला आपल्या बाजूस वळविले .1757 मध्ये इंग्रजांनी नवाबावर चाल केली त्यांची प्लासी येथे गाठ पडली आधी ठरल्याप्रमाणे नेतृत्वाखाली लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौला याचा प्लासीच्या लढाईत पराभव झाला .

२)युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले .
उत्तर -   प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडील देशांशी व्यापारी संबंध होते .आशिया व यूरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग कॉन्स्टॅन्टिनोपल या शहरातून जात असत .ऑटोमन तुर्कांनीहे शहर जिंकून मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियनांचा पूर्वेकडील व्यापार खंडित झाला .त्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले .

३)युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले .
उत्तर - नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया खंडातील देश यांच्यात नव्या जोमाने व्यापाराला सुरुवात झाली .पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अधिक व्यापारी पुढे येऊन वापरात भांडवल गुंतवणूक करू लागले . या देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असून त्यामुळे देशाची आर्थिक भरभराट होते आहे हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येऊ लागले .व्यापारासाठी लागणारे भांडवल एकत्रितपणे उभारून व्यापारी कंपन्यांच्या उदय झाला .त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले .

प्रश्न ४ .पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा .
 

दर्यावर्दी

कार्य  

बार्थोलोम्यु डायस


आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत

पोहचला.

ख्रिस्तोफर कोलंबस


भारताच्या शोधासाठी निघालेला कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहचला.

वास्को द गामा



 

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील

कालिकत बंदरात पोहचला.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post